Pages

Friday, March 17, 2023

📣 *केंद्र सरकारचे आदेश - 'या' ६ राज्यांना कोरोनावर नियंत्रण ठेवण्याचा दिला सल्ला*

 📣 *केंद्र सरकारचे आदेश - 'या' ६ राज्यांना कोरोनावर नियंत्रण ठेवण्याचा दिला सल्ला*



📝 कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्राने 6 राज्यांना पत्र लिहिले आहे. केंद्राने या राज्यांना कोरोनावर नियंत्रण ठेवण्यास सांगितले आहे. यासाठी टेस्टिंग, उपचार, ट्रॅकिंग आणि लसीकरण यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.


💁‍♀️ *पहा कोणते आहेत राज्य*


🖊️ केंद्र सरकारने महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकला कोरोनावर अधिक नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, बुधवारी देशभरात कोरोनाचे 700 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. 


📶 देशातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 4,623 वर पोहोचली आहे. तसेच महाराष्ट्रात फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात 197 रुग्ण आढळले आहेत. तर मार्चच्या पहिल्या आठवड्यात 355 तर दुसऱ्या आठवड्यात 668 रुग्ण आढळले आहेत. 


🙏 *राज्यात कोरोनाच्या रुग्णामध्ये वाढ होत आहे* - हि बातमी सर्व नागरिकांसाठी खूप महत्वाची आहे, आपण इतरांना देखील शेअर करा.



No comments:

Post a Comment

📣 *केंद्र सरकारचे आदेश - 'या' ६ राज्यांना कोरोनावर नियंत्रण ठेवण्याचा दिला सल्ला*

 📣 *केंद्र सरकारचे आदेश - 'या' ६ राज्यांना कोरोनावर नियंत्रण ठेवण्याचा दिला सल्ला* 📝 कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर ...